चुंबकी विभव

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत चुंबकी विभव अथवा चुंबकी सामर्थ्य हे विद्युत विभवाप्रमाणेच असलेले परिमाण असून ते चुंबकी क्षेत्राचे सामर्थ मोजण्याचे मापन आहे. चुंबकी विभव हे अदिश चुंबकी विभव आणि सदिश चुंबकी विभव अशा दोन प्रकारचे असून गरजेप्रमाणे दोहोंपैकी एक किंवा दोन्ही वापरले जाते.

गणिती सूत्रीकरण

अदिश चुंबकी विभव खालीलप्रमाणे काढले जाते -

𝐕=dWdm,

येथे,

V - चुंबकी विभव
dW - चुंबकी कार्य (भौतिकी)
dm - चुंबकी प्रभार
ΔV𝐇=C𝐇d,

येथे,

ΔV𝐇, - (चुंबकी तीव्रतावलंबी) चुंबकी विभव
C, हे रेषीय ऐकन
H - चुंबकी तीव्रता
dl - विस्थापित अंतर

आणि सदिश चुंबकी विभव A हे सदिश क्षेत्र असून ते खालीलप्रमाणे काढले जाते -

𝐁=×𝐀,𝐄=ϕ𝐀t,

येथे,

A हे सदिश चुंबकी विभव
B हे चुंबकी प्रतिस्थापना
E ही विद्युत तीव्रता
ϕ हे विद्युत अदिश विभव

A ह्या सदिश चुंबकी विभवाची किंमत खालीलप्रमाणे दिली जाते:-

𝐀=μ04π𝐈𝐝l.

किंवा,

𝐀=μ04πΩ𝐉|𝐫𝐫|d3𝐫.

येथे,

A हे सदिश चुंबकी विभव
μ0 हे अवकाश पार्यता किंवा चुंबकी स्थिरांक
Idl ही विद्युत धारा घटक
Ω हे विद्युत प्रवाह ज्या बंदिस्त आकारमानातून जाते ते आकारमान
J ही विद्युत धारा घनता
|𝐫𝐫| हे अंतर