पॉल डिरॅक

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ पॉल डिरॅक हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अनेक शोधांपैकी, त्यांनी डिरॅक समीकरणाची मांडणी केली. हे समीकरण फर्मिऑन्सचे अचूक वर्णन करते. या समीकरणाद्वारे डिरॅक यांनी प्रतिपदार्थाचे भाकीत केले.

डिरॅक समीकरण खालीलप्रमाणे लिहितात.

डिरॅक समीकरण

iγμμψmψ=0

डिरॅक यांना १९३३ मध्ये एर्विन श्र्यॉडिंगर यांच्यासोबत "आण्विक सिद्धान्ताचे नवीन उत्पादक स्वरूप शोधल्याबद्दल" भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.[]

जीवन

सुरुवातीचे जीवन

पॉल ॲड्रिएन मॉरिस डिरॅक यांचा जन्म ब्रिस्टॉल, इंग्लंड येथे ८ ऑगस्ट १९०२ रोजी झाला.[] त्यांचे वडील चार्ल्स ॲड्रिएन लॅडिस्लास डिरॅक हे सेंट-मॉरिस, स्वित्झर्लंड येथून देशांतर केलेले आप्रवासी होते. ते ब्रिस्टॉल येथे फ्रेंच भाषेचे शिक्षक म्हणून काम करीत. त्यांची आई फ्लोरेन्स हॅना डिरॅक या ब्रिस्टॉल सेन्ट्रल ग्रंथालयात येथे ग्रंथपाल होत्या. पॉल यांना बिॲट्रिस इसाबेल मार्गेरिट ही लहान बहीण आणि रेगिनाल्ड चार्ल्स फेलिक्स हा मोठा भाऊ होता. या भावाने मार्च १९२५ मध्ये आत्महत्या केली होती.[] []

डिरॅकचे वडील कठोर आणि हुकूमशहा होते, तरीही ते शारीरिक शिक्षेच्या विरोधात होते.[] डिरॅकचे त्याच्या वडिलांशी तणावपूर्ण संबंध होते. एवढे की त्यांच्या मृत्यूनंतर डिरॅकने लिहिले, "आता मला बरच स्वतंत्र वाटते आहे आणि आता मी एक स्वतंत्र माणूस आहे." चार्ल्स आपल्या मुलांना फ्रेंच भाषा यावी यासाठी जबरदस्तीने फ्रेंच भाषेतून बोलायला लावत असत. जेव्हा डिरॅकला कळाले, की त्याला जे बोलायचे आहे ते तो फ्रेंच भाषेतून व्यक्त करू शकत नाही, तेव्हा त्याने शांत राहणे पसंत केले.[][]

शिक्षण

डिरॅकचे शिक्षण पहिल्यांदा बिशप रोड प्राथमिक विद्यालय[] आणि नंतर त्याचे वडील फ्रेंच शिक्षक असलेल्या मर्चंट व्हेन्चरर्स टेक्निकल कॉलेज या मुलांच्या कॉलेजमध्ये झाले.[] या संस्थेमध्ये आधुनिक भाषाशिक्षणाशिवय वीटकाम, बूट शिवणे, धातुकाम यांसारख्या तांत्रिक विषयांवर भर होता.[१०] त्यावेळी ब्रिटनमध्ये माध्यमिक शिक्षणत फक्त मूलभूत विषय शिकवले जात असल्याने पॉल डिरॅक यांना मिळालेले शिक्षण असामान्य होते. त्याबद्दल डिरॅकने नंतर कृतज्ञता व्यक्त केली.[११]

डिरॅकने ब्रिस्टल विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.[१२] १९२१ मध्ये पदवी पूर्ण करण्यापूर्वी त्याने केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजची प्रवेश परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला आणि त्याला मासिक ७० पौंडांची शिष्यवृत्तीही मिळाली, पण ती केंब्रिजमध्ये राहून शिक्षण पूर्ण करण्यासाठी येणारा खर्च भागवण्यासाठी पुरेशी नव्हती. अभियांत्रिकीची पदवी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होऊनसुद्धा पहिल्या महायुद्धानंतरच्या आर्थिक मंदीमुळे त्याला अभियंता म्हणून काम मिळाले नाही. त्याऐवजी त्याने ब्रिस्टल विद्यापीठात गणितामध्ये बॅचलर ऑफ आर्टस या विनाशुल्क पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.[१३]

१९२३ मध्ये डिरॅक पुन्हा एकदा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला आणि त्याला युनायटेड किंग्डमच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाकडून £१४०ची शिष्यवृत्ती मिळाली.[१४] ही आणि सेंट जॉन्स कॉलेजची पहिली £७०ची शिष्यवृत्ती केंब्रिजमध्ये राहण्यासाठी पुरेशी होती. तिथे त्याने त्याच्या आवडीच्या व्यापक सापेक्षतावाद आणि नुकताच अस्तित्वात आलेला पुंज भौतिकशास्त्र या विषयांमध्ये राल्फ फॉवलर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केले.[१५] जून १९२६ मध्ये त्याने पीएचडी पदवी पूर्ण केली, आणि त्याचा प्रबंध पुंजयामिकी-(क्वांटम मेकॅनिक्स)वरील जगातील पहिला प्रबंध होता.[१६] त्याने पुढे कोपनहेगन आणि ग्यॉटिंगन इथे संशोधन चालू ठेवले.[१७]

पॉल डिरॅक त्याच्या पत्नीसोबत कोपनहेगन इथे, जुलै १९६३

ब्रिस्टल विद्यापीठाची बी.एस्‌सी. (इ.स. १९२१) व केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. (इ.स. १९२६) या पदव्या मिळविल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील विस्कॉन्सिन व मिशिगन (इ.स. १९२९) व प्रिस्टन (इ.स. १९३१) या विद्यापीठांत अभ्यागत व्याख्याते म्हणून काम केले. परत आल्यावर त्यांची केंब्रिज विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून इ.स. १९३२ साली नेमणूक झाली. इ.स. १९४७–४८ मध्ये व पुन्हा इ.स. १९५८–५९ मध्ये त्यांनी प्रिस्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेत काम केले.[१८]

कुटुंब

डिरॅकने मार्गिट विग्नर हिच्याशी १९३७ मध्ये लग्न केले. त्याने मार्गिटच्या ज्युडिथ आणि गॅब्रिएल या दोन मुलांना दत्तक घेतले. पॉल आणि मार्गारेट डिरॅक यांना मेरी एलिझाबेथ आणि फ्लोरेन्स मोनिका या दोन मुली झाल्या. मार्गारेट या मॅन्सी म्हणूनही ओळखल्या जात.

पॉल डिरॅकला भेटलेले आणि त्यांच्यामुळे प्रभावित झालेले कोरिअन भौतिकशास्त्रज्ञ वाय. एस. किम यांनी एका वृत्तान्तात म्हणले, " मॅन्सीने आमचे आदरणीय पॉल डिरॅक यांची चांगली काळजी घेतली हे भौतिकशास्त्राचे भाग्य आहे. डिरॅक यांनी १९३९-४६ या काळात अकरा शोधनिबंध प्रसिद्ध केले. मॅन्सी यांनी इतर जबाबदाऱ्या पार पाडल्यामुळेच डिरॅक संशोधनामध्ये नेहमीची उत्पादकता राखू शकले."[१९]

संशोधन

पुरस्कार

संदर्भ

साचा:संदर्भयादी

स्रोत

बाह्यदुवे

साचा:नोबेल भौतिकशास्त्र

साचा:भौतिकशास्त्रज्ञ साचा:Authority control