पूर्ण संख्या

पूर्ण संख्या किंवा पूर्णांक[१] (इंग्लिश: Integer, इंटिजर) म्हणजे नैसर्गिक संख्या (शून्यासह) (म्हणजे ०, १, २, ३, ४, ...), तसेच शून्याखेरीज अन्य नैसर्गिक संख्यांची ऋणरूपे [श १] (म्हणजे −१, −२, −३, ..) या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येतात - म्हणजेच त्या कोणत्याही अपूर्णांकाशिवाय किंवा दशांशचिन्हाशिवाय मांडता येतात. उदाहरणार्थ, २१, ४ व −२०४८ या पूर्ण संख्या होत; मात्र ९.७५, ५१/२ या पूर्ण संख्या नव्हेत.
या संख्या वास्तव संख्यांचा[श २] उपसंच [श ३] असून {..., −२, −१, ०, १, २, ...} या संचात बसू शकतात. पूर्णांक संख्यांचा संच ठळक टायपातल्या Z या रोमन वर्णाक्षराने (किंवा ब्लॅकबोर्ड ठळक टायपातल्या , युनिकोड U+2124 साचा:Unicode), दर्शवतात. "अंक" या अर्थाच्या जर्मन भाषेतल्या "त्सालेन" (जर्मन: Zahlen) या शब्दातील "झेड" अक्षरावरून हे चिन्ह आले आहे. साचा:विस्तार
पारिभाषिक शब्द
संदर्भ व नोंदी
चुका उधृत करा: "श" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="श"/> खूण मिळाली नाही.