घिसड (भौतिकी)

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

भौतिकीत "घिसड" हे परिमाण म्हणजे जोरचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले धक्का होय. हे परिमाण संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी घिसड ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते.

घिसड खालील समीकरणानी व्याख्यित केली जाते:

𝐓=d𝐘dt=d2𝐅dt2=d3𝐩dt3
𝐓=d3𝐩dt3=md3𝐯dt3=ms

येथे,

𝐓 - घिसड
𝐘 - जोर
𝐅 - बल
𝐩 - संवेग
m - वस्तुमान
𝐯 - वेग
s - धक्का
t - काल

घिसडचे एकक म्हणजे जोर प्रत्येकी काल अथवा वस्तुमानवेळा अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद. (kg·m/s, किग्रॅ·मी/से), किंवा न्यूटन प्रत्येकी वर्ग सेकंद (N/s, न्यू/से).

संदर्भ

हे सुद्धा पहा

साचा:चलनगतिकी



साचा:भौतिकी-अपूर्ण