गुरुत्व स्थिरांक

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

गुरुत्व स्थिरांक (G) हा भौतिकीतल्या मूलभूत स्थिरांकांपैकी एक असून सामान्यपणे ते न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमात आणि अल्बर्ट आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतेत आढळून येते.

नियम आणि स्थिरांक

न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमाप्रमाणे दोन पदार्थांमधील गुरुत्वबल-

F=Gm1m2r2 

येथे समानुपाताचा स्थिरांक म्हणून G हे गुरुत्व स्थिरांक आलेले आहे. त्याच्या किंमतीचे निश्चितीकरण खालील सूत्राने करता येते-

G=Fr2m1m2 

आणि ती निश्चिती पहिल्यांदा कॅव्हेन्डिशने केली. त्याप्रमाणे त्याची किंमत

G=6.67384(80)×1011 m3 kg1 s2=6.67384(80)×1011 N(m/kg)2

एवढी आहे.