गुरुत्व प्रवाह

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

भौतिकीत (Φ किंवा ΦE ने दर्शविला जाणारा) गुरुत्व प्रवाह हे एखाद्या पृष्ठातून जाणाऱ्या गुरुत्व तीव्रतेच्या घटकाचे मापन आहे. त्याचे मापन गुरुत्व तीव्रतेचा घटक आणि त्या क्षेत्राचा गुणाकाराने केले जाते.

गणिती सूत्रीकरण

गुरुत्व प्रवाह गणिती स्वरूपात खालीलप्रमाणे लिहीले जाते-

ΦG=𝐠𝐒=gScosθ,

किंवा अतिसूक्ष्म क्षेत्रासाठी dS -

dΦG=𝐠d𝐒.

येथे:

ΦG आणि dΦG हे अनुक्रमे गुरुत्व प्रवाह आणि अतिसूक्ष्म गुरुत्व प्रवाह
g ही गुरुत्व तीव्रता
S आणि dS हे अनुक्रमे क्षेत्र सदिश आणि अतिसूक्ष्म क्षेत्र सदिश

पृष्ठ ऐकनाच्या स्वरूपात खालीलप्रमाणे:-

ΦG=S𝐠d𝐒.