अपवर्तन
Jump to navigation
Jump to search

अपवर्तन किंवा प्रणमन (इंग्लिश : Refraction) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेत तरंगाच्या गतीतील बदलामुळे तरंगाची दिशा बदलते. सहसा असे वर्तन तरंग एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरत असताना घडते, कारण दोन भिन्न गुणधर्मांच्या माध्यमांमधून जाताना तरंगाची गतीही भिन्न असते. अपवर्तनाचे शास्त्रीय विवरण स्नेल यांच्या नियमानुसार केले जाते; ज्यानुसार θ1 हा आयात कोन θ2 या अपवर्तन कोनाशी या सूत्राने बद्ध असतो :
यात v1 व v2 हे संबंधित माध्यमांतील तरंगाचे वेग आहेत आणि n1 व n2 हे अपवर्तनांक आहेत.
