अपकेंद्र बल

testwiki कडून
Jump to navigation Jump to search

पदार्थाला वक्ररेषेत मार्गक्रमण करायला भाग पाडणाऱ्या बलाला अपकेंद्र बल (Centripetal Force) असे म्हणले जाते. या बलाची दिशा प्रत्येक क्षणी पदार्थाच्या गतीच्या दिशेबरोबर काटकोनात आणि मार्गाच्या त्या क्षणीच्या वक्रताकेंद्राकडे असते. उदाहरणार्थ : वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या पदार्थावर अपकेंद्र बल काम करत असते. हे बल निसर्गात अस्तित्वात असणारे एखादे मूलभूत बल नसून वेगवेगळ्या प्रकारची बले एका विशिष्ट परिस्थितीमध्ये पार पाडत असणाऱ्या भूमिकेचे वर्णन आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला भाग पाडताना सूर्य व पृथ्वी यांमधील गुरुत्वाकर्षणाचे बल हे अपकेंद्र बलाची भूमिका बजावते; तर रस्त्यावरून धावणारी गाडी वळत असताना गाडीची चाके व रस्ता यांमधील घर्षणाचे बल अपकेंद्र बलाची भूमिका बजावते. १६५९ मध्ये डच भौतिकशास्त्रज्ञ ख्रिस्तियन हायजेन्स यांनी या बलामागचे गणित विकसित केले.

गणिती सूत्र

m एवढे वस्तुमान असणाऱ्या आणि v एवढ्या स्पर्शवेगाने r एवढी वक्रता त्रिज्या असणाऱ्या मार्गावर मार्गक्रमण करत असणाऱ्या वस्तूवर प्रेरित होत असणाऱ्या अपकेंद्र बलाची किंमत खालील गणितीय सूत्राने दिली जाते :[]

F=mac=mv2r

येथे ac हे अपकेंद्र त्वरण आहे. अपकेंद्र बलाची दीशा पदार्थ ज्या वर्तुळावर फिरतो आहे त्या वर्तुळाच्या केंद्राकडे असते.

संदर्भ

साचा:संदर्भयादी