विद्युत धारा

testwiki कडून
imported>अभय नातूद्वारा २१:०३, १ जानेवारी २०२५चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:बदल

कंडक्टर मधून वाहणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉन चा प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट होय.

किंवा एकक कालावधीत वाहणारा एकूण इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजे करंट होय.

विद्युत धारा ॲम्पिअर या एककामध्ये मोजतात.
विद्युत धारा मोजण्यासाठी  ॲमीटर चा वापर केला जातो. 
(वरील दोन्ही व्याख्या विचारात घेता अणूची रचना समजणे गरजेचे आहे.)

अणुमध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन इत्यादी घटक असतात. प्रोटॉन वर पॉझिटिव्ह ( धन प्रभारित) चार्ज व इलेक्ट्रॉन वर निगेटिव्ह चार्ज ( ऋण प्रभारित ) असतो. न्यूट्रॉन्स वर कोणताही चार्ज नसतो. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे अणुच्या केंद्रकामध्ये असतात. तर इलेक्ट्रॉन्स हे अणूच्या भोवती वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत असतात.

अणुमध्ये इलेक्ट्रॉन ची संख्या प्रोटॉन ची संख्या समान असते. त्यामुळे अणू हा न्यूट्रल असतो. 
अणूमध्ये असलेल्या एकूण इलेक्ट्रॉन्स ची किंवा प्रोटॉन ची संख्या म्हणजे अणुअंक होय.

अणूच्या कक्षांमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स हे 2n² या सूत्राने शोधले जातात. यामध्ये n म्हणजे कक्षेचा क्रमांक होय.

उदाहरणार्थ. जर अणूच्या पहिल्या कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन्स शोधायचे असतील, n = 1.
त्यामुळे 2n²= 2x (1)²= 2.
म्हणजे अनुच्या पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन्स असतील.

त्याचप्रमाणे अनुच्या दुसऱ्या, तिसऱ्या,चौथ्या कक्षांमध्ये अनुक्रमे 8, 18, 32, अशी इलेक्ट्रॉनची संख्या असेल.

अणूच्या या कक्षा K, L, M, N या इंग्रजी अक्षराने दाखवल्या जातात.

अणुच्या सर्वात बाहेर असणाऱ्या आणि कक्षा अपूर्ण ठेवणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला फ्री इलेक्ट्रॉन्स असे म्हणतात.

उदाहरणार्थ. तांबे या धातूचा अणुअंक 29 आहे. म्हणजे तांब्याच्या अणूमध्ये वेगवेगळ्या कक्षांमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स 2,8,18,1 याप्रमाणे असतील. येथे सर्वात बाहेरच्या कक्षेत फक्त एक इलेक्ट्रॉन आहे. तो कक्षा अपूर्ण ठेवतो. अशा इलेक्ट्रॉन ला फ्री इलेक्ट्रॉन म्हणतात. जेव्हा कंडक्टरच्या दोन टोकांच्या मध्ये विभवांतर (व्होल्टेज ) प्रयुक्त केलं जातं तेव्हा हे फ्री इलेक्ट्रॉन एका सरळ दिशेत वाहू लागतात. यालाच इलेक्ट्रिकल करंट असे म्हणतात. उदा. जर कंडक्टरची दोन टोके बॅटरीला जोडले, तर त्या वाहकामधून वाहणारे इलेक्ट्रॉन्स हे बॅटरीच्या ऋण टोकाकडून त्या वाहकामधून बॅटरीच्या धन टोकाकडे वाहू लागतील. इलेक्ट्रॉनच्या या वहनालाच इलेक्ट्रिकल करंट असे म्हणतात. हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज घेऊन वाहतात.

एका इलेक्ट्रॉन वर 1.602 x 10⁻¹⁹ कुलोम एवढा चार्ज असतो.

म्हणजे जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स वाहत जातील तेवढाच जास्त करंट इलेक्ट्रॉन चा विरुद्ध दिशेला वाहील.हा करंट

I=Qt,
या सूत्राने माहीत करू शकतो.
- येथे q म्हणजे कंडक्टर मधून वाहणारा इलेक्ट्रिकल चार्ज.
- t म्हणजे हा चार्ज वाहण्यासाठी लागणारा वेळ.


गणिती रूप

विद्युत धारा (किंवा थोडक्यात धारा) खालीलप्रमाणे व्याख्यित आहे:-

विद्युत प्रभाराचे कालसापेक्ष बदलणारा दर म्हणजेच विद्युत धारा होय.

विद्युतधारेचे दोन प्रकार आहेत ते पुढील प्रकारे ; Direct Current DC( स्थिर मूल्याची विद्युतधारा ) आणि Alternating Current AC ( कालपरत्वे बदलणारी विद्युतधारा). ह्यांचे दोन प्रकार त्यांच्या वाहण्याच्या दिशेवरून ठरतात. DC प्रकारच्या विद्युतधारेत प्रभार ही नेहमी धन क्षेत्रापासून ऋण क्षेत्राकडे वाहते. AC विद्युतधारेत प्रभार हा सेकंदात बहुतेकदा त्याची दिशा बदलतो , हा दिशा बदल त्याच्या वारंवारता (Hz) Hertz ह्यावर सांगता येतो.

गणिती स्वरूपात-

I=Qt,

किंवा भैदन रूपात:

I=dQdt.

येथे,

I - विद्युत धारा
Q, dQ - विद्युत प्रभार
t, dt - काळ

धारा घनताच्या संज्ञेत धाराचीही व्याख्या करता येते.

धारा घनता सदिश आणि क्षेत्र सदिश ह्यांच्यामधील बिंदू गुणाकार म्हणजेच विद्युत धारा होय.

गणिती रूपात -

I=JA

येथे,

J - धारा घनता
dA - क्षेत्र सदिश