हिसका (भौतिकी)

testwiki कडून
imported>सांगकाम्याद्वारा १०:१३, २५ एप्रिल २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

भौतिकीत, हिसका, किंवा प्रत्वरण, तीव्रती आणि झोकांडी, हे त्वरणाचे कालसापेक्ष भैदिज आणि वेगाचे दुसरे भैदिज किंवा स्थानाचे तिसरे भैदिज आहे. हिसका हे परिमाण खालीलपैकी कुठल्याही रूपांत लिहीला जाऊ शकतो::

j=dadt=d2vdt2=d3rdt3

येथे,

a - त्वरण,
v - वेग,
r - स्थान,
𝑡 - काल.

हिसका ही सदिश असून अदिश किंमतीसाठी साधारण संज्ञा वापरली जात नाही (जसे, वेगासाठी "चाल").

एस.आय. एककांमध्ये हिसका मीटर प्रत्येकी घन सेकंद (मीटर प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद प्रत्येकी सेकंद, m/s किंवा m·s−३ किंवा मी/से किंवा मी·से−३). हिसक्यासाठी सर्वमान्य असे चिन्ह नाही, तथापि सामान्यपणे j हे चिन्ह वापरले जाते. त्वरणाचा भैदिज म्हणून न्यूटनचा दर्शक (a˙) वापरला जाऊ शकतो. विशेषतः "हिसका"ऐवजी "तीव्रती" किंवा "झोकांडी" संज्ञा संदर्भात वापरली जाते.

तसेच जोर—बलाचे कालसापेक्ष भैदिज सुद्धा हिसक्याची संबंधीत आहे.

उपयोजन

त्रि-कोटि गति रेखाचित्र

हिसका व्यवस्था

हिसका व्यवस्था ही एक रचना आहे जिची तऱ्हा हिसका समीकरणांनी वर्तविली जाते. ह्या समीकरणाची रुपे ह्या पद्धतीची असतात साचा:Harv:

d3xdt3=f(d2xdt2,dxdt,x)

हिसका समीकरणाचे एक उदाहरण म्हणजे:

d3xdt3+Ad2xdt2+dxdt|x|+1=0.

निर्कलन स्पष्टीकरण

समीकरणे

  • y=ΔFΔt (जोर: बल प्रत्येकी एकक काल)
  • j=ΔaΔt (हिसका: त्वरण प्रत्येकी एकक काल)
  • j=ΔFmΔt

जर उच्च बल किंवा त्वरण प्रयुक्त असेल तर उच्च हिसका बसतो. त्वरणामध्ये सूक्ष्म कालावधीत बदल होत असेल तेव्हापण हिसका उच्च असतो.

हे सुद्धा पहा

नोंद

साचा:संदर्भयादी

संदर्भ

बाह्य दुवे

साचा:शुद्धगतिकी