चुंबकन

testwiki कडून
imported>TivenBotद्वारा १०:५८, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

अभिजात विद्युतचुंबकीत चुंबकन किंवा चुंबकन ध्रुवीकरण किंवा चुंबकीकरण हे एक सदिश क्षेत्र असून ते चुंबकी पदार्थांत कायमस्वरूपी किंवा प्रस्थापित झालेल्या चुंबकी द्विध्रुव जोराच्या घनतेचे मापन आहे.

व्याख्या

चुंबकन खालीलप्रमाणे दाखविता येते:

𝐌=NV𝐦=n𝐦

येथे, M हे चुंबकन; m ही चुंबकी जोर सदिश; V हे आकारमान; आणि N पदार्थांमधले एकूण चुंबकी जोर. N/V हे परिमाण सहजा संख्या घनता ह्या अर्थाने n असे लिहिले जाते, आणि येथे ते चुंबकी जोराची संख्या घनता बनते. M-क्षेत्र हे एसआय एककांत ॲम्पिअर प्रति मीटर (A/m) मध्ये मोजले जाते.[]

संदर्भ

साचा:संदर्भयादी