पायथागोरसचा सिद्धान्त

testwiki कडून
imported>QueerEcofeministद्वारा २२:१६, २८ फेब्रुवारी २०१९चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search
पायथागोरसचा सिद्धान्त

पायथागोरसचा सिद्धान्त हा भूमितीतील एक अत्युपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो.

या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. याचा वापर करून काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असतील तर तिसरी बाजू काढता येते.

समजा cही कर्णाची लांबी असेल व aआणि bह्या इतर दोन बाजूंची लांबी असतील तर पायथागोरसच्या सिद्धान्तानुसार: c2=a2+b2