चुंबकीय स्थितीज ऊर्जा

testwiki कडून
imported>Khirid Harshadद्वारा १०:३७, ८ ऑगस्ट २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत चुंबकी स्थितीज उर्जा, चुंबकी विभवी उर्जा किंवा चुंबकी सामर्थिक उर्जा ही स्थितीज किंवा विभवी उर्जा असून ते काही चुंबकी प्रभारबिंदूवर प्रयुक्त अक्षय्य चुंबकी बलाने केलेले ठराविक विस्थापन म्हणजेच कार्यामुळे निर्माण होते.

व्याख्या

चुंबकी स्थितीज उर्जा खालीलप्रमाणे काढली जाते-

UH(r)=rrefr𝐅d𝐬

म्हणजेच-

UH(r)=μ04πmMr

येथे,

UB(r) ही (चुंबकी तीव्रतावलंबी) चुंबकी स्थितीज उर्जा
F हे चुंबकी बल
ds हे चुंबकी बलाने विस्थापित केलेला m प्रभाराचे विस्थापन
H ही चुंबकी तीव्रता
μ0 हा अवकाश पार्यता अथवा चुंबकी स्थिरांक
M, m हे अनुक्रमे पहिला चुंबकी प्रभार आणि ज्याच्यावर बलप्रयुक्त आहे असा दुसरा चुंबकी प्रभार
r हे M, m ह्या दोन प्रभारांमधले अंतर

त्याचप्रमाणे खालील व्याख्यापण वापरली जाते: बाह्य चुंबकी क्षेत्र Bच्या प्रभावाखाली असलेला चुंबकी जोर m ह्याची स्थितीज उर्जा:-

U=𝐦𝐁.

क्षेत्रामधील चुंबकीकरण M म्हणजे

U=12𝐌𝐁dV,

येथे dV हे चुंबकी क्षेत्र जात असलेले बंदिस्त आकारमान